शिवसेना गटनेत्याला उपरती, पत्रकारांची मागितली माफी

0
1518

MOKHADA-SHIVSENA UPARTIप्रतिनिधी/मोखाडा, दि. 21 : मोखाडा तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी 19 नोव्हेंबर सर्व विरोधी पक्षांनी होळी आंदोलन केले होते. या आंदोलनात पालघर जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते प्रकाश निकम यांनी पालकमंत्री विष्णु सवरा यांच्या विरोधात गरळ ओकत त्यांच्या दौर्‍याच्या बातम्या प्रसिद्ध करणार्‍या पत्रकारांना मुर्ख म्हटले होते. या घटनेचा पत्रकारांनी निषेध व्यक्त केल्यानंतर उपरती झालेल्या प्रकाश निकम यांनी सर्व पत्रकारांना फोन करून तसेच समाज माध्यमातून दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली आहे.

मोखाड्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी सोमवारी होळी आंदोलन करीत तालुका बंद ठेवला होता. या आंदोलनात शिवसेनेचे गटनेते प्रकाश निकम यांनी आपल्या जाहीर भाषणात सवरा दुष्काळाची मागणी करतो आणि पत्रकार मुर्खासारखे छापतात, अशा शेलक्या भाषेतील व खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य केले होते. या घटनेचा मोखाड्यातील विविध पत्रकार संघटनांनी निषेध व्यक्त करत यापुढे निकम यांच्या कोणत्याच कार्यक्रमाचे वृत्तांकन न करण्याचा निर्णय घेतला होता. याविषयी माहिती मिळताच, आपले वक्तव्य चुकल्याची उपरती प्रकाश निकम यांना झाली. अखरे त्यांच्यासह शिवसेनेच्या इतर पदाधिकार्‍यांनी सर्व माध्यमांच्या पत्रकारांना फोन करून या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून माफी मागितली आहे. त्यामुळे मोखाड्यातील हा वाद आता निवळला आहे.

[divider]

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!