राजतंत्र न्युज नेटवर्क
पालघर दि. २७ : जिल्हा परिषद पालघर कार्यालयाच्या ठिकाणी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अतंर्गत प्रजासत्ताक दिनी सॅनिटरी व्हेन्डीग मशीन व इन्सिनेटरचे उद्घाटन महिला व बाल कल्याण समिती सभापती धनश्री चौधरी व समाजकल्याण सभापती दर्शना दुमाडा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालघर जिल्हा परिषदचे अध्यक्ष विजय खरपडे, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, पोलिस अधिक्षक गौरव सिंग, जिल्हा परिषद उपाध्यक्ष निलेश गंधे सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघरत्ना खिल्लारे, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी, अधिकारी, पदाधिकारी तसेच पाणी व स्वच्छता विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील महिला व जिल्हा परिषद शाळांमधील 11 ते 19 या वयोगटातील किशोरवयींन मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकीन व वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव जागृती करणे व माफक दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्याकरिता अस्मिता योजनेचा शुभारंभ राज्यस्तरावर करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद पालघर यांचे वतीने पुढाकार घेण्यात आलेला आहे. जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचारी यांना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकीनची उपलब्धता व्हावी याकरिता कार्यालयात मशीन बसविण्यात आली आहे. तसेच वापर केलेले सॅनिटरी नॅपकिन उघड्यावर फेकून न देता इन्सिनेटर मशीनद्वारे विल्हेवाट देखील लावता येणार आहे.
[divider]
- आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा