पालघर जिल्हा: दिवसभरात 6 +Ve व 45 संशयीत रुग्ण वाढले

0
2763

(16.04.2020) आज दिवसभरात, पालघर जिल्ह्यात 6 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली असून, एकूण आकडा 75 वर पोचला आहे. हे सर्व 6 रुग्ण विरार वसई महानगर क्षेत्रातील आहेत. त्यामुळे एकट्या वसई तालुक्यातील कोरोना बाधीतांची संख्या 62 झाली आहे. जिल्ह्यातील मृत्यूंचा आकडा 5 स्थिर राहिला आहे. या व्यतिरिक्त कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या, 45 संशयीत रुग्णांची भर पडली असून, त्यांचे तपासणी अहवाल येणे बाकी आहेत. त्यातील सर्वाधिक 30 जणांना पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 13 जणांना बोळींज येथे व 2 जण डहाणू उप जिल्हा रुग्णालयात दाखल आहेत.

संबंधित आजची बातमी वाचा :- एकूण कोरोना +ve 69; एका दिवसांत 14 वाढले!