एकूण कोरोना +ve 69; एका दिवसांत 14 वाढले!

0
2477

mahanews Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV

पालघर, दि. 16 एप्रिल: पालघर जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या आता पालघर जिल्ह्यातील नवे 8 व डहाणू तालुक्यातून 2 रुग्ण वाढल्यामुळे, 69 झाली आहे. त्यातील 5 जणांचा मृत्यू झाला असून, 2 जण आजारातून बरे झाले आहेत. बरे होणाऱ्यामध्ये डहाणू उप जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 3 वर्षीय मुलीचा समावेश आहे. या मुलीची टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे तीला घरी सोडण्याची शक्यता आहे.

नव्या 14 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये डहाणूतील बाधीत मुलगी पालघर तालुक्यातील काटाळे येथील ज्या वीटभट्टीवर होती, त्या परिसरातील 5 समावेश झाल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अन्य 3 पालघर तालुक्यातील सफाळे परिसरातील आहेत. डहाणू तालुक्यातील कासा ग्रामीण रुग्णालयातील 2 डॉक्टर्सचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याची धक्कादायक बाब समोर आली असून त्यातून डहाणूच्या आकडेवारीत 2 ने वाढ झाली. वसई विरार महानगर क्षेत्राचा आकडा आज 4 ने वाढला आहे.

आतापर्यंत निष्पन्न झालेल्या 69 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे:

  • विरार वसई महानगर क्षेत्र – 53 (त्यातील 4 मृत्यू)
  • वसई ग्रामीण क्षेत्र – 3
  • पालघर तालुका – 10 (त्यातील 1 मृत्यू)
  • डहाणू तालुका – 3

आतापर्यंत 980 लोकांच्या घशाचे नमुने तपासले. त्यातील 596 तपासणी अहवाल प्राप्त झाले. 247 अहवाल प्राप्त होणे बाकी आहे.

  • 69 अहवाल कोरोना पॉझिटीव्ह (11%)
  • 527 अहवाल कोरोना निगेटिव्ह (89%)


सध्या 82 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. एमसीजीएम रेस्ट हाऊस (अंधेरी) – 1; ठाणे येथील जिल्हा सामान्य रुग्णालय – 9; जसलोक (मुंबई) – 5; एमजीआरएम (पवई) – 2; रहेजा हॉस्पिटल (मुंबई) – 0 (1 रुग्ण बरा झाल्याने सुट्टी दिली); बोळिंज हॉस्पिटल (वसई) – 19 (6

पॉझिटीव्ह व 13 अहवाल बाकी); डहाणू उप जिल्हा रुग्णालय – 5 (1 पॉझिटीव्ह व 4 अहवाल प्राप्त नाही); ग्रामीण रुग्णालय (पालघर) – 2; रिद्धीविनायक हॉस्पिटल (नालासोपारा) 9 ; सेव्हन हिल्स हॉस्पिटल 8; हॉरिझोन प्राईम हॉस्पिटल (ठाणे) – 4; शताब्दी हॉस्पिटल (कांदिवली) – 1: अग्रवाल हॉस्पिटल (वालिव) – 5; टिमा हॉस्पिटल – 10 ; कोकिलाबेन हॉस्पिटल – 1; कस्तुरबा हॉस्पिटल – 1.

  • 307 जण होम क्वारन्टाईन आहेत.
  • 112 जणांना इन्स्टीट्यूशनल क्वारन्टाईन केलेले आहे.
  • 82 रुग्ण लक्षणे आढळल्यामुळे रुग्णालयात दाखल.
  • 980 जणांचे घशाचे नमुने घेतलेले आहेत.
  • 527 नमुने निगेटिव्ह.
  • 247 तपासणी अहवाल प्राप्त होणे बाकी बाकी आहे.
  • 69 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह. व त्यातील 5 पॉझिटीव्ह रुग्णांचा मृत्यू.