डहाणू दि. 15: डहाणू रेल्वे स्थानक परिसरातील भाजी मार्केट अखेर स्थलांतरीत करण्यात आले आहे. डहाणूचे सहाय्यक जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी आज भाजी बाजाराला भेट दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. येथे सोशल डिस्टन्सींगचे नियम पाळले जात नसल्याबद्दल दैनिक राजतंत्रने वृत्त प्रसारित केले होते. दरम्यान प्रशासनाने सकाळपासून पोलिस तैनात करुन गर्दी नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला होता. तरीही या परिसरातील मोठ्या संख्येने असलेल्या बॅन्कांमध्ये येणाऱ्या ग्राहकांना अडचणी येत होत्या. आज कटीयार यांनी स्वतः बाजाराला भेट दिल्यानंतर त्यांना वस्तुस्थिती लक्षात आली व तातडीने निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे लोकांकडून स्वागत केले जात आहे.
डहाणूरोड भाजी मार्केट: सोशल डिस्टन्सींगची ऐसीतैसी
उद्यापासून (16.04.2020) घाऊक भाजी बाजार सोमवार बाजार परिसरात बसवण्यात येणार आहे. आणि स्टेशन परिसरातील रांगेत उभ्या असलेल्या हातगाड्याना तेथे उभे राहून धंदा करण्यास मनाई करण्यात आली आहे. हातगाडीवरुन धंदा करणाऱ्याना आता शहराच्या विविध भागात भाजी विक्री करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे लोकांना आता आपल्या परिसरात भाजी मिळणे शक्य होणार आहे. रेल्वे स्टेशन परिसरात होणारी अनावश्यक गर्दी उद्यापासून होणार नाही.
डॉक्टरकी विसरुन अधिकार डोक्यात गेलेले डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे
mahanews Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV