वैदेही वाढण/बोईसर, दि. 9 : येथील अवधनगर भागात भंगारच्या गोदामात वेल्डिंगचे काम सुरु असताना सिलेंडरचा स्फोट होऊन एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. हजारी मौर्या असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.
तारापूर औद्योगिक वसाहतीला खेटून असलेल्या अवधनगर भागात मोठ्या प्रमाणात भंगार व्यवसाय केला जातो. त्यामुळे येथे मोठं-मोठे भंगारचे गोदाम आहेत. यातील अनेक गोदामांमध्ये कामगारांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता त्यांच्याकडून कामे करुन घेतली जातात. अशाचप्रकारे आज, सोमवारी दुपारी 12 च्या सुमारास बाबुभाई भंगारवाले यांच्या गोदामात वेल्डिंगचे काम सुरु असताना सिलेंडरचा स्फोट झाला. यात 40 वर्षीय हजारी मौर्या यांचा होरपळून मृत्यू झाला. तर 35 वर्षीय छोटू गौतम हा कामगार गंभीर जखमी झाला असुन त्याच्यावर बोईसरमधील संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.