शिरीष कोकीळ/mahanews MEDIA :
डहाणू दि. 18 : 26 नोव्हेंबर रोजीच्या संविधान दिनाचे औचित्य साधून दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी 24 तासांत सर्वाधिक भाषणे देण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविण्याचा संकल्प केला आहे. यापूर्वी 24 तासांतील सर्वाधिक 30 भाषणांच्या विश्वविक्रमाची नोंद आहे. हा विक्रम तोडण्यासाठी 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 ते 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.25 वाजेपर्यंत दिवसरात्रीत 32 पेक्षा जास्त भाषणांचे आयोजन करण्यात येत आहे. दिवसा विविध संस्थांमध्ये व रात्रीच्या सुमारास विविध हाऊसिंग सोसायट्यांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
ही सर्व भाषणे भारतीय संविधानातील विविध पैलूंवर होणार असून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या नियमावलीनूसार प्रत्येक ठिकाणी उत्स्फूर्त, अलिखित आणि वेगवेगळी भाषणे करावी लागणार आहेत. सर्व कार्यक्रमांचे व्हिडीओ शूटिंग करण्यात येणार असून दर 4 तासांचे निरीक्षण करण्यासाठी 2 पंच याप्रमाणे 12 पंच आपला अहवाल सादर करतील. सर्व कार्यक्रमातील श्रोते विभिन्न असणार आहेत व प्रत्येक श्रोत्यांचे नाव, पत्ते नोंदवून स्वाक्षर्या नोंदविल्या जाणार आहेत. उपस्थित प्रेक्षकांचे छायाचित्र देखील सादर केले जाणार आहे.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड संघटनेद्वारे पंच म्हणून जबाबदारी पार पाडण्यासाठी स्थानिक वकील, डॉक्टर्स व प्राध्यापक यांना अनुमती देण्यात आली आहे. भारतीय संविधानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी हा प्रयत्न केला जात असून अधिकाधिक संस्थांनी, व्यक्तींनी या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन संजीव जोशी यांनी केले आहे.
कार्यक्रमात उपस्थित श्रोत्यांचे नाव, पत्ते लिहून स्वाक्षरी घ्यावयाची असल्याने कृपया सर्वांनी किमान 15 मिनटे आदी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन कार्यक्रमाचे समन्वयक समितीने केले आहे.
कार्यक्रमाचे नियोजित वेळापत्रक पुढीलप्रमाणे :-
1. अ. ज. म्हात्रे ज्युनियर कॉलेज नरपड, तालुका डहाणू ,
सोमवार, दिनांक 26 नोव्हेंबर * स. 7.30 *
2. उप जिल्हा रुग्णालयासमोरील मैदान आगर, तालुका डहाणू ,
सोमवार, दिनांक 26 नोव्हेंबर * स. 8.00 *
3. बाबुभाई पोंदा ज्युनियर कॉलेज पारनाका, डहाणू , तालुका डहाणू ,
सोमवार, दिनांक 26 नोव्हेंबर * स. 8.30 *
4. सेंट मेरीज ज्युनियर कॉलेज मसोली, तालुका डहाणू ,
सोमवार, दिनांक 26 नोव्हेंबर * स. 9.00 *
5. एस. आर. करंदीकर महाविद्यालय वडकून, तालुका डहाणू ,
सोमवार, दिनांक 26 नोव्हेंबर * स. 9.30 *
6. पांचाळ समाज हॉल वडकून, तालुका डहाणू ,
सोमवार, दिनांक 26 नोव्हेंबर * स. 10.00 *
7. एच. एम. पी स्कूल, मसोली, तालुका डहाणू ,
सोमवार, दिनांक 26 नोव्हेंबर * स.10.30 *
8. सरस्वती मंदीर सभागृह अनुताई वाघ ज्युनियर कॉलेज, कोसबाड, तालुका डहाणू ,
सोमवार, दिनांक 26 नोव्हेंबर * स. 11.15 *
9. गिजुभाई बधेका सभागृह , विकासवाडी अध्यापक विद्यालय, कोसबाड, तालुका डहाणू ,
सोमवार, दिनांक 26 नोव्हेंबर * स. 11.40 *
10. विज्ञान सभागृह, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड, तालुका डहाणू ,
सोमवार, दिनांक 26 नोव्हेंबर * स. 12.05 *
11. पद्मश्री अनुताई वाघ कर्णबधिर विद्यालय नारायण उद्यानच्या बाजूला, डहाणूरोड (प), तालुका डहाणू ,
सोमवार, दिनांक 26 नोव्हेंबर * दु. 12.40 *
12. एच अँड एच जे वकील मॉडेल स्कूल मसोली, डहाणूरोड (प), तालुका डहाणू ,
सोमवार, दिनांक 26 नोव्हेंबर * दु. 01.05 *
13. जिल्हा परिषद मल्याण मराठी शाळा मल्याण, डहाणूरोड (प), तालुका डहाणू ,
सोमवार, दिनांक 26 नोव्हेंबर * दु. 1.30 *
14. कॉ. शामराव परुळेकर ज्युनियर कॉलेज आशागड, तालुका डहाणू ,
सोमवार, दिनांक 26 नोव्हेंबर * दु. 2.05 *
15. क्रेडो वर्ल्ड स्कूल सरावली सावटा, तालुका डहाणू ,
सोमवार, दिनांक 26 नोव्हेंबर * दु. 2.35 *
16. कस्तुरबा गांधी बालीका विद्यालय सरावली सावटा, तालुका डहाणू ,
सोमवार, दिनांक 26 नोव्हेंबर * दु. 3.00 *
17. के. के. मेस्त्री हायस्कूल रावली सावटा, तालुका डहाणू ,
सोमवार, दिनांक 26 नोव्हेंबर
18. रुस्तमजी ऍकेडमी सरावली, तालुका डहाणू , सोमवार,
दिनांक 26 नोव्हेंबर * दु. 3.55 *
19. समर्थ सेवा भगिनी मंडळ डहाणू फोर्ट, तालुका डहाणू ,
सोमवार, दिनांक 26 नोव्हेंबर * दु. 4.50 *
20. दी डहाणूरोड जनता सह. बँक लोकमान्य टिळक चौक, डहाणूरोड (प)
सोमवार, दिनांक 26 नोव्हेंबर * सायं. 5.15 *
21. रोटरी सभागृह 2 रा मजला, अन्नपूर्णा पार्क, मल्याण, डहाणूरोड (प), सोमवार,
दिनांक 26 नोव्हेंबर * सायं. 6.10*
22. जैन मंदीर सभागृह गोपीपुरा, डहाणूरोड (पूर्व)
सोमवार, दिनांक 26 नोव्हेंबर * सायं. 6.50 *
23. नारायण उद्यान, लॉयन्स पार्क, डहाणूरोड (प),
सोमवार, दिनांक 26 नोव्हेंबर * सायं. 7.30 *
24. संस्कृत पाठशाला, वैभव कॉम्प्लेक्स इराणी रोड, डहाणूरोड (प),
सोमवार, दिनांक 26 नोव्हेंबर * रात्री 8.00 *
25. खूले पटांगण, विद्युत नगर सहकारी गृह. सोसा., मसोली, डहाणूरोड (प),
सोमवार, दिनांक 26 नोव्हेंबर * रात्री 8.30 *
26. खूले पटांगण, पटेल प्लाझा सहकारी गृह. सोसा., मसोली, डहाणूरोड (प),
सोमवार, दिनांक 26 नोव्हेंबर * रात्री 9.00 *
27. लक्ष्मी नारायण देऊळ सभामंडप डहाणू फोर्ट, तालुका डहाणू ,
सोमवार, दिनांक 26 नोव्हेंबर * रात्री 9.30 *
28. जोशी नगर खूले पटांगण इंट्रीगेट रोड, डहाणूरोड (पूर्व)
सोमवार, दिनांक 26 नोव्हेंबर * रात्री 10.10 *
29. शांती कृपा बिल्डींग मसोली, डहाणूरोड (प) सोमवार,
दिनांक 26 नोव्हेंबर * रात्री 10.40 *
30. सुभाष लेन खूले पटांगण डहाणू फोर्ट, तालुका डहाणू ,
सोमवार, दिनांक 26 नोव्हेंबर * रात्री 11.15 *
31. जयराज अपार्टमेंट, मेन रोड, डहाणू फोर्ट,
सोमवार, दिनांक 26 नोव्हेंबर * रात्री 11.45 *
32. प्रगती, मेनरोड, डहाणू फोर्ट,
मंगळवार, दिनांक 27 नोव्हेंबर * रात्री 12.15 *
33. शिलेदार गणेशोत्सव खूले पटांगण
डहाणू फोर्ट, तालुका डहाणू मंगळवार,
दिनांक 27 नोव्हेंबर * मध्य रात्री 01.15 *
34. डहाणू किल्ल्यासमोरील खूले पटांगण, डहाणू फोर्ट, तालुका डहाणू मंगळवार,
दिनांक 27 नोव्हेंबर * रात्री 01.50 *
35. जि. प. शाळा पाटीलपाडा येथील पटांगण पाटीलपाडा, वडकून, तालुका डहाणू
मंगळवार, दिनांक 27 नोव्हेंबर * रात्री 02.20 *
36. ब्राह्मणआळी, बाडापोखरण, तालुका डहाणू ,
दिनांक 27 नोव्हेंबर * रात्री 03.00 *
37. माच्छी समाज सभागृह,
सावटा, तालुका डहाणू
दिनांक 27 नोव्हेंबर * पहाटे 04.00 *
38. पुष्पलता पार्क, मल्याण, डहाणूरोड (प)
दिनांक 27 नोव्हेंबर * पहाटे 05.30 *
39. दशाश्री वणीक समाज हॉल मसोली, डहाणूरोड (प), तालुका डहाणू
मंगळवार, दिनांक 27 नोव्हेंबर * पहाटे 06.00 *
40. पारेख प्लाझा पहिला मजला, मल्याण, डहाणूरोड (प)
मंगळवार, दिनांक 27 नोव्हेंबर * पहाटे 06.30 *
अधिक माहिती साठी आपण पुढील समन्वयकांशी संपर्क साधू शकता:
1) राजेश पारेख 9673649497
2) सुधिर कामत 9823513347
3) विवेक करकेरा 9975494217
4) अजय भगत 9987564702
5) पर्सी जमशेतवाला 9272446626
[divider]
- आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!