पालघर तालुक्यात 836 कोरोना रुग्ण – एकूण मृत्यू 13 – बोईसर मोठा हॉटस्पॉट (223)

0
4625

पालघर, दि. 22: जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पालघर तालुका सर्वाधिक कोरोनाग्रस्त तालुका ठरला आहे. येथे आजपर्यंत 836 कोरोनाबाधीत निष्पन्न झाले असून त्यातील 599 जण पूर्णतः बरे झाले आहेत. 224 जणांवर उपचार सुरु असून 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

पालघर तालुक्यातील एकट्या बोईसर मध्ये 223 रुग्ण निष्पन्न झाले असून त्या खालोखाल पालघर नगरपरिषद क्षेत्रात 144 रुग्ण आढळले आहेत. सातपाटी येथील बाधीतांची संख्या 75, केळवा 43, सफाळे 35, उमरोळी 26, दातिवरे 23, मनोर 22, पास्थळ टॅप्स 19, सालवड 16 आणि माहीम 14 अशी कोरोनाबाधीतांची आकडेवारी आहे.