वार्ताहर
बोईसर दि. १४ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एकर चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा मनिषा पोहूरकर यांच्या पुढाकाराने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. वसुंधरा, डॉ. पाटकर, डॉ. उपाध्यक्ष या तज्ञ् डॉक्टरांकडून सुमारे ९० रुग्णांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत आजाराचे निदान झालेल्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत.