दिनांक 23.03.2020: अखेर महाराष्ट्र सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात लॉक डाऊन जाहीर केले आहे. आता लोकांना अत्यावश्यक कारणासाठीच घराबाहेर पडता येणार आहे. लोकांनी कोरोना विषाणूच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी केलेल्या उपाय योजनांना फारसा प्रतिसाद न दिल्यामुळे हा अप्रिय निर्णय घ्यावा लागणार आहे. राज्याच्या सीमा बंद करण्यात येत असून जिवनावश्यक वस्तुंच्या वाहतुकीला परवानगी मिळणार आहे.
सर्व प्रकारची बस वाहतूक बंद करण्यात आली आहे. टॅक्सीसेवा फक्त २ प्रवासी व रिक्षा सेवा फक्त १ प्रवासी वाहतूक करण्याच्या अटीवर सुरु ठेवण्यात येणार आहे. खासगी वाहनातून चालकाव्यतिरिक्त केवळ एका व्यक्तीस प्रवास करता येईल. या सर्व प्रवाशांना अत्यावश्यक असलेल्या कारणांसाठीच प्रवास करता येणार आहे. क्वारन्टाईन केलेली व्यक्ती बाहेर फिरताना आढळल्यास गुन्हा दाखल करुन अशा व्यक्तीची शासकीय क्वारन्टाईन केंद्रात रवानगी करण्यात येणार आहे. जिवनावश्यक वस्तूंच्या दुकानात ग्राहकांमध्ये ३ फूट अंतर ठेवण्याची आखणी व सॅनीटायझर / हात धुण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. एकावेळी ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येवू शकणार नाहीत.
या आदेशाच्या अनुषंगाने, चांगल्या हेतूने कार्य करणाऱ्या व्यक्तींना कायदेशीर कारवाईतून वगळले आहे.
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येत 7 ने वाढ! एकूण कोरोना बाधीत 71 (मृत्यू 2); गुजरात राज्यातील कोरोना बाधीत संख्येत 11 ने वाढ होऊन आता संख्या 29 (मृत्यू 1). (देशभरात एकूण 7 कोरोनाग्रस्तांचे मृत्यू)
विश्वसनीय बातम्यांसाठी mahanews.com या संकेतस्थळाला भेट द्या! रुपये 300 भरुन आमचे E-Subscriber बना: – https://imjo.in/vq7QpV