आजपासून शहरी भागात अनावश्यक घराबाहेर पडण्यास मनाई

0
1881

पालघर, दि. २३ मार्च : करोना (कोव्हीड १९) विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पालघरचे जिल्हाधिकारी यांनी आज पहाटे ५ वाजल्यापासून ३१ मार्चच्या रात्री १२ वाजेपर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत. या मनाई आदेशांतर्गत जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायती, आणि बोईसर व तारापूर ग्रामपंचायती क्षेत्रात कोणालाही राहते घर /ठिकाण सोडून कोणत्याही सार्वजनिक अथवा खासगी ठिकाणी, रस्ते, या ठिकाणी प्रवेश करणे, उभे रहाणे, ताटकळणे, भटकणे, वाहन चालवणे, असे करण्यास बंदी करण्यात आली आहे.
या बंदीतून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे.

वगळण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवा पुरवठादार व आस्थापना:
 • दुध, अन्यधान्य, अंडी, मासे, चिकन, मटण, फळे व भाजीपाला.
 • पशू व पोल्ट्री खाद्य व त्याची वाहतूक.
 • रुग्णालये, औषधे व वैद्यकीय साहित्य.
 • बॅंका व वित्तीय सेवा, दुरध्वनी व दुरसंचार सेवा.
 • विमान व बंदर संबंधित सेवा.
 • विज, पेट्रोलियम व ऑईल.
 • पिण्याचे पाणी व पाणीपुरवठा.
 • अत्यावश्यक वस्तूचा साठा व वितरण करणारी व्यवस्था.
 • अत्यावश्यक सेवांशी संबंधित (आय टी) माहिती व तंत्रज्ञान सेवा (मर्यादित मनुष्यबळ).
 • अत्यावश्यक वस्तू व माल आणि त्यासंबंधीत व्यक्तीची वाहतूक (तसा फलक लावणे आवश्यक) करणारी वाहने.
 • प्रसार माध्यमे संबंधित व्यक्ती (Media).
या आदेशांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात भारतीय दंड विधान संहितेच्या कलम १८८ अन्वये गुन्हा नोंदवला जाऊ शकतो.