एसीजी कॅप्सुल कंपनी – कोरोना हॉट स्पॉट जाहीर

0
9021

एसीजी गृपची डहाणू तालुक्यातील असोसिएटेड कॅप्सुल कंपनी (आशागड) आता कोरोना हॉट स्पॉट बनली आहे. औषधांसाठीच्या रिकाम्या कॅप्सुल बनविणारी ही कंपनी अत्यावश्यक सेवा असल्याने ती लॉक डाऊनच्या कालावधीत देखील अविरतपणे सुरु होती. नियमित कामगारांची उपस्थिती कमी असल्याने मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कामगारांद्बारे अविरतपणे उत्पादन सुरु ठेवण्यात आले. अनेक कामगार हे वसई महापालिका क्षेत्रातून व अन्य हॉटस्पॉट मधून ये – करीत होते. अलीकडच्या काळात व्यवस्थापनाने हॉट स्पॉट मधून येणाऱ्या कामगारांसाठी डहाणूत निवास व्यवस्था केली होती. त्यानंतरही कॅप्सुल कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. एका व्यवस्थापन सदस्य व त्याच्या संपूर्ण परिवाराला कोरोनाचे बाधा झाल्यानंतर प्रशासनाने 17 जुलै पासून असोसिएटेड कॅप्सुल कंपनीचा समावेश हॉटस्पॉटमध्ये केला आहे. आता डहाणू तालुक्यात 1. एसीजी कॅप्सुल, 2. डहाणू नगरपरिषद क्षेत्र, 3. चिंचणी, 4. बोर्डी, 5. घोलवड, (रानशेत आणि नरपड हॉट स्पॉट च्या वर्गवारीतून वगळले आहेत.)