mahanews Media (दिनांक 25 जून 2021) : पालघर जिल्ह्यामध्ये 19 जून ते 25 जून 2021 दरम्यानचा कोरोना पॉझिटीव्हीटी दर अवघा 3.85% निघाला असून पॉझिटीव्हीटी दर 5% पेक्षा कमी राखल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. सध्याच्या धोरणाप्रमाणे पालघरचे जिल्हाधिकारी निर्बंध शिथिल करतात की शासन नव्याने एखादे धोरण जाहीर करते याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.
पालघर जिल्ह्यातून मागील आठवडाभरात 27 हजार 720 लोकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले असता त्यातील 1 हजार 67 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. हा पॉझिटीव्हीटी दर 3.85 इतका येतो व पालघर जिल्हा शासनाच्या पाच स्तरीय योजनेनुसार पहिल्या स्तरात आल्यामुळे निर्बंध उठवले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आठवडाभरात ॲक्टीव कोरोना रुग्णांची संख्या 2,167 वरुन 196 ने कमी होऊन 1,971 झाली असून कोरोनामुळे आठवडाभरात मृत्यूची संख्या 2,474 वरुन 51 ने वाढून 2525 झाली आहे. आज रोजी 2,357 स्वॅब चा तपासणी अहवाल येणे बाकी आहे.