राजतंत्र न्युज नेटवर्क दि. 16 एप्रिल 2017:
आदिवासी विकास विभागाचे ठाणे येथील अतिरिक्त आयुक्त मिलिंद भगवान गवादे (54) या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकार्यासह याच कार्यालयातील उपायुक्त किरण सुखला
ल माळी (39) यांना 12 लाख रुपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंंधक विभागाच्या पालघर पथकाने काल शनिवारी रंगेहात अटक केली आहे. या दोघांविरोधात ठाणे येथील वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7, 13(1)(ब) व 13 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अँटी करप्शन ब्युरोच्या पालघर जिल्हा युनिटचे उपविभागीय अधिकारी अजय आफळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हा सापळा रचला होता.
गवादे आणि माळी यांनी आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आश्रमशाळेतील अधिक्षक पदावरुन आश्रमशाळेच्या मुख्य अधिकारी (रेक्टर) पदावर बढती मिळालेल्या 12 कर्मचार्यांकडे प्रत्येकी 2 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाच दिली नाही तर या कर्मचार्यांची पदोन्नती रद्द केली जाईल अशी धमकी या दोघांनी दिली होती. यानंतर तडजोड करत रक्कम कमी केली व प्रत्येकी 1 लाख रूपये देण्यास सांगितले होते. जर या कर्मचार्यांनी प्रत्येकी एक लाख असे 12 लाख दिले नाहीत तर त्यांची पदोन्नती रद्द करण्यात येईल, अशी धमकी या दोघांनी दिली होती. पहिल्यांदा गावडे व माळी यांनी त्यांना प्रत्येक 2 लाख रूपयांची मागणी केली व नंंतर तडजोड करत रक्कम कमी केली व प्रत्येकी 1 लाख रूपये देण्यास सांगितले होते.
अखेर कर्मचार्यांपैकी एका तक्रारदाराने याबाबत अँटी करप्शन ब्युरोकडे (एसीबी) तक्रार केली. एसीबीतर्फे दिनांक 1 एप्रिल 2017 रोजी तक्रारीची खातरजमा केल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्या सापळ्यात हे अधिकारी अलगद सापडले.
सायंकाळी 6.45 वाजता अतिरिक्त आयुक्त मिलिंद भगवान गवादे कार्यालयात नसल्याने त्यांच्या वतीने उपायुक्त किरण सुखलाल माळी यांनी ही 12 लाख रुपयांची लाच स्विकारली. विशेष म्हणजे कुणाला कळू नये या करीता लाचेचेे पैसे आंब्याच्या पेटीत भरुन आणण्यास सांगितले होते. माळी यास रंगेहात पकडल्यानंतर त्यांच्या कार्यालयाची तपासणी केली असता तिथे आणखी 12 लाख रूपये आढळून आले. यानंतर लगेचच एसीबीच्या पथकाने गवादे यांला वांद्रे येथील निवासस्थानातून अटक केली आहे.
दोन्ही अरोपींना आज (रविवार) ठाणे येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 4 दिवसांची एसीबी कोठडी देण्यात आली आहे.
दैनिक राजतंत्रचे न्यूज पोर्टल तुम्हाला आवडले का?
- होय (82%, 243 Votes)
- नाही (10%, 30 Votes)
- अधिक समृद्ध करता येईल (8%, 23 Votes)
Total Voters: 296