पालघर जिल्ह्यात कोरोनामुळे 7 दिवसांत 34 मृत्यू – एकूण मृत्यू 178

दि. 12 जुलै: पालघर जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गामुळे मागील 7 दिवसांत 34 जणांनी आपले प्राण गमावले असून मृत्यूंची संख्या 178 झाली आहे. आतापर्यंत सर्वाधिक 155 मृत्यू वसई विरार महानगर क्षेत्रातील असून वसई ग्रामीण क्षेत्रात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पालघर तालुक्यात 8 जण, जव्हार तालुक्यात 2 जण, वाडा तालुक्यात 2 जण व विक्रमगड तालुक्यात 1 जणाचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यामध्ये 7 दिवसांत 2105 कोरोनाग्रस्तांची भर पडली असली तरी, 3228 रुग्ण पूर्णत: बरे झाले आहेत. रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या देखील 787 ने घटली आहे. 5 जुलै रोजी 3701 जण रुग्णालयात दाखल होते. आज ही संख्या 2914 इतकी घसरली आहे.

पालघर जिल्ह्याच्या वसई तालुका वगळता उर्वरीत भागात, 7 दिवसांत कोरोनाग्रस्तांची संख्या 293 ने वाढून 1362 झाली आहे. त्यापैकी 976 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून 373 जणांवर उपचार चालू आहेत. ही आकडेवारी दिलासादायक असून 7 दिवसांत मृत्यूचा आकडा 3 ने वाढून 13 झाला आहे.

तालुकानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:-
पालघर तालुक्यात 7 दिवसांत 171 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 567 झाला आहे. त्यातील 360 जण बरे झाले असून 199 जणांवर उपचार चालू आहेत. मृत्यूची संख्या 2 ने वाढून 8 झाली आहे.
वाडा तालुक्यात 7 दिवसांत 37 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 306 झाला आहे. त्यातील 252 जण बरे झाले असून 52 जणांवर उपचार चालू आहेत. मृत्यूची संख्या 2 कायम राहिली आहे.
जव्हार तालुक्यात 7 दिवसांत 24 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 153 झाला आहे. त्यातील 119 जण बरे झाले असून 32 जणांवर उपचार चालू आहेत. मृत्यूची संख्या 1 ने वाढून 2 झाली आहे.
विक्रमगड तालुक्यात 7 दिवसांत 9 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 119 झाला आहे. त्यातील 104 जण बरे झाले असून 14 जणांवर उपचार चालू आहेत. मृत्यूची संख्या 1 कायम राहिली आहे.
डहाणू तालुक्यात 7 दिवसांत 43 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 162 झाला आहे. त्यातील 103 जण बरे झाले असून 59 जणांवर उपचार चालू आहेत. तालुक्यात आजपर्यंत एकही मृत्यू झालेला नाही.
मोखाडा तालुक्यात 7 दिवसांत 7 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 30 झाला आहे. त्यातील 22 जण बरे झाले असून 8 जणांवर उपचार चालू आहेत. तालुक्यात आजपर्यंत एकही मृत्यू झालेला नाही.
तलासरी तालुक्यात 7 दिवसांत 2 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 25 झाला आहे. त्यातील 16 जण बरे झाले असून 9 जणांवर उपचार चालू आहेत. तालुक्यात आजपर्यंत एकही मृत्यू झालेला नाही.