
प्रतिनिधी/वाडा, दि.2 : तालुक्यातील पश्चिमघाट क्षेत्रात येणार्या भागात गौणखनिज उत्खननास प्रतिबंध करण्यात आल्याने येथील 11 दगडखदाणी व क्रशर मशिन बंद करण्याचे आदेश वाडा तहसीलदारांनी दिल्याने येथील दगडखदाणी व क्रशर मशिन मालकांचे धाबे दणाणले आहेत.
तालुक्यातील काही भाग हा पश्चिमघाट क्षेत्रात येत असल्याची अधिसूचना केंद्र सरकारच्या पर्यावरण व जलवायु परिवर्तन मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे. या अधिसूचनेनुसार या क्षेत्रात गौणखनिज उत्खनन करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. असे असतानाही येथील गजेंद्र स्टोन क्रशर (गुंज बुधावली), अरविंद नवरंग सिंग (कंचाड), अर्जुन दाजी पाटील (गुंज), मारूती इंटरप्रायझेस प्रा. लि. (डोंगस्ते), श्री जी स्टोन क्रशर (डोंगस्ते), एस. बी. इंटरप्रायझेस (वाघोटे), फ्रान्सीस जॉन घोन्सावलवीस (खैरे आंबिवली), रामकृष्ण गजानन भावसार (बुधावली), रमेश नागो सुतार (असनस), परफेक्ट स्टोन क्रशर (गुंज) व एम. के. स्टोन (गुंज) या दगडखदाणींमध्ये उत्खनन सुरु असल्याचे महसूल प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने त्या बंद करण्याचे आदेश वाडा तहसीलदार दिनेश कुर्हाडे यांनी दिले आहेत.
दरम्यान, तहसीलदारांच्या या आदेशाने कोट्यावधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या क्रशर मशिन बंद करण्यात आल्याने उद्योजकांचे मोठे नुकसान होणार असुन या दगडखदाणी व क्रशर मशिनवर कामासाठी असलेल्या शेकडो आदिवासींचा रोजगार बुडणार असल्याचे सांगत दगडखदाणी व क्रशर मशिन मालकांकडून या कारवाईवर नाराजी व्यक्त होत आहे.
- तुम्ही Youtube वर News Channel किंवा News Portal चालवता का? मग तुमच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी आहे!
- केळवे समुद्रात चार मुलांचा बुडून मृत्यू!
- मुजोर विराज उद्योजका विरोधात कामगार आक्रमक
- घिवलीच्या पुनर्वसनाची मागणी
- महिलेला दोन लाखाचे सोन्याचे दागिने रेल्वे पोलिसांनी केले परत
- आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा