राजतंत्र न्युज नेटवर्क
पालघर दि. २७ पालघर व डहाणू तालुक्यातील जिल्हापरिषद शाळांमधील विद्यार्थीनींसाठी पेडमेंन या महिलांना मासिक पाळीत सॅनिटरी नेपकिनांचा वापर किती महत्वाचा आहे, हे अतिशय संवेदनशीलपणे मांडण्यात आलेल्या चित्रपटाचा विशेष प्रयोग ठेवण्यात आला होता. विद्यार्थिनींना योग्य वयात मासिक पाळीबाबत माहिती होऊन त्यांच्या अनेक आरोग्य विषयक समस्या सुटाव्यात या उद्देशाने जवळ परिषदेच्या जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत विद्यार्थिनींना हा चित्रपट दाखविण्यात आला.
किशॊरवयीन मुलींना मासिक पाळी व्यवस्थापन आणि वैयक्तिक स्वच्छतेबाबत जागरूक करणे तसेच सॅनेटरी नेपकीन (स्वच्छता पेड) चा वापर करण्यासाठी प्रवृत्त करणे हे अत्यंत महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी या उपक्रमावर प्रतिक्रिया व्यक्त करताना केले. पालघर तालुक्यातील आंबोडे, चहाडे, किराट, महागाव, नांदगाव, नवली, पारगाव, शिगाव, सोमटे आणि टेम्भोडे येथी जिल्हापरिषद शाळेतील ६०० विद्यार्थ्यांना तर डहाणू तालुक्यातील आंबेसरी, आंबोली, आशागड, बांधघर, बेंडगाव, बोर्डी, चंद्रानगर, चारोटी, चिखले, चिंचणी, दापचरी, गंजाड. घोलवड, कैनाड, कंक्राडी, कासा, कोंढाणे, मल्यानं निजणे, पाले, रनकोळ्, सावटे आणि सायवान गावातील २१०० विद्यार्थिनींना हा चित्रपट दाखविण्यात आला. पालघर येथील प्रयोगास पाणी व स्वच्छता, विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघरतना खिल्लारे आणि शिक्षण अधिकारी (प्रा.) संगीत भागवत तसेच शिक्षक उपस्थित होते.
दरम्यान, याप्रमाणेच उर्वरित तलासरी, वसई, विक्रमगड, वाडा, मोखाडा आणि जव्हार या तालुक्यातही पेडमेन चित्रपट दाखविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत मासिक पाळी व्यवस्थापन, समाज-गैरसमज आदींबाबत जागरूकता निर्माण होऊन मुलींना सॅनेटरी पेडचा वापर करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा जिल्हा परिषदेचा मानस आहे.