पालघर, दि. 20 : डहाणु, पालघर, वाडा, वसई व जव्हार उपविभागीय कार्यालयांसह पालघर नगरपरिषद, डहाणु नगररिषद व जव्हार नगरपरिषदेस आपात्कालीन परिस्थितीत मदतीसाठी पोर्टेबल लायटनिंग टॉवरचे वितरण करण्यात आले आहे. नुकताच पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
या पोर्टेबल इनफलेटेबल लायटनिंग टॉवरचा आपात्कालीन परिस्थिीत पुरेसा प्रकाश पाडण्यासाठी उपयोग होतो. पावसाळ्यात पालघर जिल्ह्यात जास्तीचा पाऊस होतो त्या कालावधीत जिल्ह्यातील विविध ठिकाणे आपत्तीचे शिकार होतात. जसे पुर, समुद्राला भरती येणे, भुस्खलन होणे, अशा विविध प्रकारच्या आपत्यांना तोंड द्यावे लागते. आपत्तीच्या परिस्थितीमध्ये घडलेल्या आपत्तीचे निरसन करण्यासाठी रात्रीच्या सुमारास या लायटनिंग टॉवरचा उपयोग होतो. हे टॉवर 15 फुट उंच व त्याचा प्रकाश 50 मिटरच्या परिघात पडतो. तरी आपत्तीच्या काळात या इनफलेटेबल लायटनिंग टॉवरचा उपयोग करण्यात यावा, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.