राजतंत्र न्यूज नेटवर्क
दि. २२: विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेतानाच भारतीय संविधान समजून घेणे गरजेचे असून आपल्या अधिकार आणि कर्तव्याची जाणीव झाल्याने उद्याचे सक्षम नागरिक बनण्यास मदत होईल असे प्रतिपादन दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी बोरीगाव येथे बोलताना केले. पूज्य आचार्य भिसे शिक्षण संस्थेच्या सभागृहात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
डहाणू तालुक्यातील नूतन बाल शिक्षण संघाच्या कोसबाड येथील विकासवाडी अध्यापक विद्यालयाची पद्मभूषण ताराबाई मोडक व पद्मश्री अनुताई वाघ यांनी मुहूर्तमेढ रो
वल्याला ६० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त विकसवाडी अध्यापक विद्यालयाचे हिरक महोत्सवी वर्ष साजरे केले जात असून वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून या संविधान व शिक्षणाचा हक्क या विषयी जन जागृती करणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे सचिव विजय म्हात्रे, संस्थापक सदस्य तथा ज्येष्ठ पत्रकार अच्युत पाटील, मुख्याद्यापिका सौ. दीपा पाटील, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी निरंजन राऊत, माजी मुख्याद्यापक भूपेंद्र सावे, नूतन बाल शिक्षण संघाचे प्रतिनिधी सुधीर कामत उपस्थित होते.

मुलांनी मतदानाचा हक्क प्राप्त होईपर्यंत शिक्षणाचा हक्क, पंचायत राज व्यवस्था समजून घेतले पाहिजेत. ग्रामसभेत आवर्जून राहिले पाहिजे व लोकशाही व्यवस्थेमध्ये आपला सक्रीय सहभाग नोंदवून गावाचा विकास साधला पाहिजे असे मार्गदर्शन देखील जोशी यांनी यावेळी बोलताना केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ दीपा यांनी प्रास्ताविक केले तर अच्युतभाई यांनी संजीव जोशी यांचा परिचय करुन दिला. शेवटी जाधव सर यांनी आभार प्रदर्शन केले.