आजपासून खाजगी वाहनांना पेट्रोल व डिझेलची विक्री नाही, अत्यावश्यक सेवांना सूट!

0
1719

दि. 09.04.2020: पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांनी आजपासून खाजगी वाहनांना पेट्रोल व डिझेल विक्री करण्यास मनाई केली आहे. तसे आदेश पेट्रोलपंप चालकांना देण्यात आलेले आहेत. आज सकाळी 9 वाजतापासून या आदेशाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी Lock Down च्या काळात, लोकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये, यासाठी करण्यात आलेली ही उपाययोजना आहे. या आदेशातून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना मात्र वगळण्यात आलेले आहे.

कोरोना संदर्भात दैनिक राजतंत्रच्या Updates साठी खालील Link ला भेट द्या! Let’s fight with CORONA