बोईसर, दि. 9 : शिवसेनेचे नेते तथा महाराष्ट्राचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज बोईसरमधील सरावली-विद्यानगर येथे कोरोना संसर्गामुळे बंद करण्यात आलेल्या वृत्तपत्र वाचनालयाचे नूतनीकरण करून तसेच सोलारची व्यवस्था करून उद्घाटन करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जनताभिमुख कार्य व्हाव,े वाचनसंस्कृती जिवंत राहावे, तरुणांना व्यवसाय- रोजगाराच्या असलेल्या संधींचे वृत्तपत्राच्या माध्यमातून आकलन व्हावे यादृष्टीने कुंदन संखे यांनी मंत्री शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे वृत्तपत्र वाचनालय सुरू केले आहे.
याप्रसंगी शिवसेनेचे पालघर लोकसभा समन्यवक प्रभाकर राऊळ, पालघर क्षेत्रप्रमुख वैभव संखे, सरावलीच्या सरपंच लक्ष्मी चांदणे, उपसरपंच अशोक शाळुंके, शिवसेना उप तालुकाप्रमुख वैभव भोईर, विद्यानगर मंडळाचे उपाध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य काशीनाथ संखे, खैरापाडा ग्रामपंचायत सदस्य तानाजी चव्हान, ज्येष्ठ नागरिक प्रमोद संखे, चव्हान, भट, चौधरी, नीलिम संखे तसेच विद्यानगरचे रहिवासी नारायण सावंत, तन्मय संखे, हर्षल पिंपळे, रुपेश संखे, पार्वती माने, अपेक्षा संखे, नम्रता तामोरे व मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिक, महिला व तरुणवर्ग उपस्थित होता.