
डहाणू पुर्वेतील पटेलपाडा भागात राहणारे हर्षचे वडील वैभव भुवड यांनी याबाबत पोलीसांत तक्रार नोंदवली असुन त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वैभव भुवड व त्यांच्या पत्नी नोकरीस असल्याने हर्ष एकटाच घरी असायचा. 27 मार्च रोजी वैभव यांच्या पत्नी कामावरुन घरी पोचल्या असता हर्ष घरी नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी हर्ष वापरत असलेल्या मोबाईलवर त्यांनी फोन केले. मात्र त्यास हर्षने उत्तर दिले नाही. सायंकाळी उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने भुवड दाम्पत्याने त्याचा सर्वत्र शोध सुरु केला. तसेच नातेवाईकांना फोन करून विचारपुस केली मात्र त्याचा पत्ता लागला नाही. यादरम्यान हर्षच्या व्हॉट्सअॅप नंबरवरुन मला शोधण्याचा प्रयत्न करु नका, मी घरी येणार नाही अशा आशयाचा व्हाईस मॅसेज वैभव यांना पाठविण्यात आला. त्यामुळे हर्ष पळून गेला असावा अथवा त्याचे अपहरण झाल्याचा संशय वैभव भुवड यांनी वर्तविला असुन त्यानुसार डहाणू पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डहाणू पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.