वाडा, दि. 11 : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आर्थिक सहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत वाडा तालुका शिवसेनेच्या वतीने 1 लाख 12 हजार 931 रुपयांचा धनादेश शुक्रवारी (दि.11) वाडा तहसिलदार डॉ. उद्धव कदम यांच्याकडे सुपूर्द केला. तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वैयक्तीकरित्या स्वत:कडील रक्कम जमा करुन हा मदत निधी उभारला आहे.
यावेळी सेनेचे उप जिल्हा प्रमुख सुनील पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष निलेश गंधे, जिल्हा सह समन्वयक गोविंद पाटील, तालुका प्रमुख उमेश पटारे, तालुका समन्वयक प्रकाश केणे, तालुका सचिव निलेश पाटील, माजी तालुका प्रमुख प्रकाश पाटील, पंचायत समितीचे सभापती योगेश गवा, सदस्य अमोल पाटील, महिला आघाडीच्या विधानसभा संपर्क संघटक मनाली फोडसे, तालुका संघटक रेश्मा पाटील, नगराध्यक्षा गीतांजली कोलेकर, उपनगराध्यक्षा वर्षा गोळे नगरसेवक जागृती कालन, युवती प्रमुख अलकनंदा भानुशाली, अर्चना पाटील, शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.