10 एप्रिल रोजीची राष्ट्रीय लोक अदालत तहकूब

0
2565

दि. 8 एप्रिल: कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेल्या ” ब्रेक द चेन ” निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर ठाणे व पालघर जिल्ह्यातील जिल्हा व तालुका न्यायालयात 10 एप्रिल रोजी नियोजीत ” राष्ट्रीय लोक अदालत ” तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाने याबाबत प्रसिद्धी पत्रक प्रसूत केले आहे.