डहाणूत मटका अड्ड्यावर छापा; 6 ते 7 आरोपींवर गुन्हे दाखल

0
3846

डहाणू, दि. 25 : तालुक्यातील आशागड चरी नाका येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या मटका नामक जुगाराच्या अड्ड्यावर डहाणू पोलिसांनी छापा मारुन 6 ते 7 आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. चरी नाका भागात काही इसम मटका जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर काल, 24 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7.15 वाजेच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली.

विजय पांडु निबला (वय 32), कृष्णा सुरेश दुमाडा (वय 21), लखमा रुपजी सुतार (वय 45), टिकु रजेश गुप्ता अशी आरोपींची नावे असुन इतर आरोपींची नावे समजू शकली नाही. या अड्ड्यावरुन पोलिसांनी 1480 रुपयांची रोख रक्कम तसेच आरोपींचे मोबाईल, दोन दुचाकी व जुगाराचे साहित्य असा एकुण 1 लाख 11 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

दरम्यान, आरोपींविरुद्ध डहाणु पोलीस स्टेशनमध्ये मुंबई जुगार अ‍ॅक्ट 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे.