जिल्हा परिषद निवडणूकीच्या तोंडावर भाजपला खिंडार

0
2333

मोखाड्यातील भाजपचे माजी तालुकाध्यक्ष विठ्ठल चोथे शिवसेनेत

प्रतिनिधी/मोखाडा, दि. 19 : जिल्हा परिषद निवडणूकीच्या तोंडावरच मोखाडा तालुक्यातील भाजपचे माजी तालुकाध्यक्ष विठ्ठल चोथे यांनी भाजपाला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.

विठ्ठल चोथे यांनी आज, गुरुवारी (दि.19) शिवसेनेचे विक्रमगड विधानसभा संघटक प्रल्हाद कदम, सभापती प्रदीप वाघ, माजी सभापती दमयंती फसाळे, उपतालुका प्रमुख वासुदेव खंदारे, पालघर जिल्हा परिषदेचे गटनेते प्रकाश निकम, तालुका प्रमुख अमोल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षप्रवेश झाल्याने भाजपला त्याचा मोठा फटका बसणार आहे.

याबाबत विठ्ठल चोथे यांच्याशी संवाद साधला असता, पक्षांतर्गत मतभेदांमुळे मी भाजपला रामराम ठोकला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.