* पालघर नगरपरिषद निवडणूक २०१९ :

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. २५ : पालघर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीचा निकाल आश्चर्यकारक असा आला असून राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व बहुजन विकास आघाडीच्या उमेदवार डॉ. उज्वला काळे या नगराध्यक्षपदासाठी झालेल्या थेट लढतीत विजयी झाल्या आहेत. परंतु आघाडीकडे बहुमत आले नसून 14 नगरसेवक निवडून आणणारा शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपचे ७ नगरसेवक निवडून आले तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे २ नगरसेवक निवडून आलेले आहेत. ५ जागांवर अपक्ष विजयी झाले आहेत. कॉंग्रेस आणि बहुजन विकास आघाडीला भोपळा देखील फोडता आलेला नाही
या वेळी प्रथमच भाजप आणि शिवसेना युती करुन निवडणूकीला सामोरे गेले होते. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या पालघरमध्ये सेना नेतृत्वाने राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून आयात झालेल्या श्वेता मकरंद पाटील या उमेदवाराला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्याचा निर्णय वादग्रस्त आणि आत्मघातकी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. या निर्णयामुळे व निष्ठावंत शिवसैनिकांना डावलल्यामुळे सेनेला बंडखोरीचा सामना करावा लागला. त्यातून डॉ. उज्वला यांचा विजयाचा मार्ग सोपा झाला. भाजप सेनेला प्रचारात थेट मुख्यमंत्र्यांना उतरवावे लागले. मात्र तरीही नगराध्यक्षपदाची जागा मिळवता आली नाही.
उज्वला काळे कोण आहेत?
उज्वला काळे या पालघर नगरपरिषदेच्या पहिल्याच निवडणूकीत भाजपतर्फे निवडून आल्या होत्या. त्यानंतरच्या काळात भाजप केंद्रातून व राज्यातून सत्तेवरून पायाउतार झाल्यानंतर त्यांचे पती केदार काळे व उज्वला कॉंग्रेसमध्ये आल्या. केदार काळे हे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष असून उज्वला या कॉंग्रेस नगरसेविका होत्या. आता आघाडीच्या समीकरणात पालघर शहरात कॉंग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीची ताकद अधिक असल्याने त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची अट मान्य करुन घड्याळ चिन्हावर उभ्या राहिल्या व विजयी झाल्या. आता त्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये व पती कॉंग्रेसमध्ये असल्यामुळे आघाडीचे समीकरण जुळलेले राहिल. शिवाय बहुमत सेना भाजपकडे असले तरी त्यांनी सेना भाजपमध्ये केलेले असल्याने नगरपरिषदेचा सर्वांना बरोबर घेऊन काम करण्यात त्यांना अडचण येणार नाही.
उमेदवार, पक्ष व त्यांना मिळालेल्या मतांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे!
(विजयी उमेदवारांची नावे, पक्ष व मते ठळक अक्षरात)
- 1 अ-अनुसुचित जमाती
दिनेश पांडूरंग बाबर (अपक्ष) 1019
विलास पांडुरंग काटेला (भाजप) 267
भालचंद्र दांडेकर बाबू (राष्ट्रवादी) 331
नितेश एकनाथ बसवत (अपक्ष) 109
- 1 ब-सर्वसाधारण (महिला)
मेमन शेरबानु मुनाफ (अपक्ष) 1087
रुंजी राजेश घुडे (शिवसेना) 310
सुनीता मधुकर भोईर राष्ट्रवादी 267
मनीषा प्रमोद काळपुंड अपक्ष 61
- 2 अ -नागरीकांचा मागास प्रवर्ग(महिला)
प्रियंका राजेंद्र म्हात्रे शिवसेना 1298
परविन अफरोज शेख बविआ 659
- 2 ब-सर्वसाधारण
रवींद्र मधुकर म्हात्रे शिवसेना 787
इम्रान करीम शेख राष्ट्रवादी 292
आरिफ उस्मान कलाडीया अपक्ष 514
बिंदिया संतोष दीक्षित अपक्ष 409
जावेद मजीद लुलानीया अपक्ष 6
विकास शिवशरण सिंह अपक्ष 8
- 3 अ-अनुसुचित जमाती(महिला)
मोना मुन्ना मिश्रा भाजप 1451
कांता रविंद्र अधिकारी बविआ 797
योगिता चंदू धोडी अपक्ष 447
- 3 ब-सर्वसाधारण
तुषार दिलीप भानुशाली शिवसेना 1062
सुरज रमेश धोत्रे राष्ट्रवादी 1005
मनोहर सोनू दांडेकर अपक्ष 247
संजू किसन धोत्रे अपक्ष 215
महेश अर्जुन धोडी अपक्ष 186
आमदयाल उग्रनाथ यादव अपक्ष 21
- 4 अ-अनुसुचित जमाती (महिला)
कविता सुरेश जाधव अपक्ष 1051
हेमा कृष्णकांत गडग राष्ट्रवादी 171
मनीषा राजू लडे भाजप 745
- 4 ब-सर्वसाधारण
प्रविण मधुकर मोरे अपक्ष 1080
कुश संजय दुबे राष्ट्रवादी 139
अमर शिवमोहन द्विवेदी शिवसेना 729
- 5 अ-अनुसुचित जमाती
दिनेश गोपाळ घरट शिवसेना 1476
स्वप्नाली वामन जाधव राष्ट्रवादी 1253
- 5 ब-सर्वसाधारण (महिला)
हिंदवी विरेंद्र पाटील राष्ट्रवादी 1354
गीतांजली अद्वैत पाटील शिवसेना 1043
रेश्मा हिमांशु घरत अपक्ष 359
- 6 ब-सर्वसाधारण (महिला)
लक्ष्मीदेवी धनराज हजारी भाजप 1054
धृतिका महेश पंड्या राष्ट्रवादी 429
सफीना रईस खान अपक्ष 976
- 7 अ-नागरीकांचा मागास प्रवर्ग
राजेंद्र आत्माराम पाटील शिवसेना 1473
अनिस अशरफ शेख बविआ 1013
- 7 ब – सर्वसादारण महिला
अलका पोपटसिंग राजपुत भाजप 1237
आरती हिमालय संखे राष्ट्रवादी 1221
- 8 अ-नागरीकांचा मागास प्रवर्ग
चंद्रशेखर गोपीनाथ वडे शिवसेना 709
संतोष अशोक चुरी बविआ 410
उत्तम रमेश पिंपळे अपक्ष 698
- 8 ब-सर्वसाधारण (महिला)
शिल्पा अमर बाजपेई राष्ट्रवादी 999
वंदना सुरेंद्र तिवारी शिवसेना 783
- 9 अ-नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला)
अनुजा अशोक तरे शिवसेना 668
शालिनी राधाकृष्णन मेनन बविआ 320
- 9 ब- सर्वसाधारण
प्रथमेश उत्तम पिंपळे अपक्ष 497
अतुल जनार्दन पाठक शिवसेना 465
अनिता प्रफुल्ल प्रजापती राष्ट्रवादी 50
- 10 ब-सर्वसाधारण
अक्षय किशोर संखे शिवसेना 988
निशांत शरद धोत्रे मनसे 100
सचिन बाबुराव पाटील राष्ट्रवादी 971
- 11 अ-अनुसूचित जाती महिला
चेतना हेमंत गायकवाड शिवसेना 994
कृतिका दिनेश गवई मनसे 831
वृषाली विकास भोणे राष्ट्रवादी 652
स्नेहल प्रशांत गायकवाड अपक्ष 171
रुपाली श्याम शेलार अपक्ष 62
- 11 ब-सर्वसाधारण
भावानंद शांताराम पाटील भाजप 1039
विनय गंगाधर आघाव मनसे 598
नंदकुमार वामन पाटील राष्ट्रवादी 718
कैलास तुलसीप्रसाद त्रिवेदी भाकप (मार्क्स) 62
सागर भरत मौर्य अपक्ष 332
- 12 अ-सर्वसाधारण (महिला)
राधा अरविंद मानकामे शिवसेना 1829
दिपा तुशार पामाळे राष्ट्रवादी 1351
- 12 ब-सर्वसाधारण
सुभाष विष्णू पाटील शिवसेना 1978
भुपेंद्र घरत राष्ट्रवादी 1025
- 13 अ-नागरीकांचा मागास प्रवर्ग
अनिता शशिकांत किणी भाजप 1537
दर्शना दत्तोत्रय राऊत राष्ट्रवादी 1268
गीता गंगाराम संखे मनसे 212
- 13 ब-सर्वसाधारण
अमोल प्रकाश पाटील शिवसेना 1426
गौतम नामदेवराव गायकवाड राष्ट्रवादी 1290
अविनाश श्रीराम भोरे मनसे 129
राऊत चंद्रकांत भास्कर अपक्ष 111
कृष्णा रामप्यारे उपाध्याय अपक्ष 89
- 14 अ-नागरीकांचा मागास प्रवर्ग
उत्तम मोरेश्वर घरत शिवसेना 1293
किरण राजेंद्र पाटील काँग्रस 400
प्रतिक संजय चौधरी अपक्ष 103
परेश चंद्रकांत पाटील अपक्ष 153
अजित मनाहर भुवड अपक्ष 23
- 14 ब-सर्वसाधारण (महिला)
रोहिणी अशोक अंबुरे भाजप 1122
प्रफुल्ला जितेंद्र परमार राष्ट्रवादी 510
नेहा नितीन शिंदे अपक्ष 315
- आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा