
राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 24 : पालघरमधील सत्यम बुक या रासायनिक उत्पादन घेणार्या कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याचे वृत्त आहे. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूराचे लोट दिसुन येत असुन आजुबाजूच्या तीन कंपन्या आगीच्या विळख्यात सापडल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगार अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात असुन आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तर पोलीस प्रशासन आणि अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असल्याची माहिती आहे.
- आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा