
दीपक गायकवाड/मोखाडा दि. 7 : राष्ट्रीय पेयजल योजना कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील गोमघर येथे सौरऊर्जेवरील नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाचे भुमीपुजन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे यांच्या हस्ते करण्यात आले. तालुक्यातील पाणीटंचाईच्या धर्तीवर अशा योजनांना पहिली पसंती मिळत असुन या योजना तळागाळातील जनतेसाठी जीवनदायिनी ठरत आहेत.
मोखाडा तालुका हा पाणीटंचाईबाबत अत्यंत संवेदनशिल म्हणून परिचित आहे. आजही असंख्य गांवांमधून पाणीटंचाईची समस्या भेडसावत असते. अशा परिस्थितीत जलसंचय साधने, नळपाणी पुरवठा योजना, छोटी-मोठी धरणे अशा चिरस्थायी साधन संपत्तीवर भर देणे आवश्यक झाले आहे. शासन हंगामी पाणी पुरवठ्यावर लक्षावधी रूपये खर्च करीत आहे. परंतू ही उपाययोजना अत्यंत जुजबी असल्याने कायमस्वरूपी उपाय योजना करण्याची मागणी तालुक्यातुन मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. त्यामुळे सौरऊर्जेवरील नळपाणी पुरवठा सारख्या योजनांना तालुक्यातुन पहिली पसंती मिळत आहे.
मोखाड्याचे सभापती प्रदीप वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा, जिल्हा परिषद सदस्य दिलीप गाटे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महेश पाटील, गटविकास अधिकारी श्रीमती संगीता भांगरे-डहाळे, गोमघर येथील ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप गारे आदी मान्यवर भुमिपुजन सोहळ्यासाठी उपस्थित होते.
- आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा