राजतंत्र न्यूज नेटवर्क
जव्हार,दि. 22 : देशातील व ईतर विविध भागात अल्पवयीन मुलींवर होणारे बलात्कार व लैगींक अत्याचार याच्यां जाहिर निषेध करण्याकरीता जव्हार शहरातील चालक मालक संघ व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून बुधवारी सायंकाळी एस. स्टॅन्ड येथे कॅन्डल मार्च काढून निषेध व्यक्त केला. तसेच शुक्रवार दि. 20 एप्रिल रोजी सायंकाळी विजयस्तंभ यशवंतनगर ते यशवंत मुकणे पुतळ्याला वळसा घालुन गांधीचौक पर्यत रॅली काढून निषेध नोंदवून या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी शहरातील व परीसरातील शेकडो स्त्रिया व नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आहे. पोलीस उपनिरिक्षक कांबळे याप्रकरणी तपास करीत आहे.
निषेध कॅन्डल मार्च आयोजन राष्ट्रवादीच्या नगरसेवीका रश्मिन मनियार, विशाखा साळवे, कमल कुवरे, निर्माला घाटाळ, माजी नगरसेविका मनीषा वाणी, प्रा. प्रज्ञा कुलकर्णी यांनी केले होते. यावेळी नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल, विरोधीपक्ष नेते दिपक कांगणे, माजी नगराध्यक्ष रियाज मनियार, संदिप वैद्य, सुन्नी मुस्लिम ट्रस्टचे अध्यक्ष खलील कोतवाल तसेच शेकडो महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.