जव्हारमध्ये एका 22 वर्षीय तरुणाने फेसबुक लाईव्ह करुन स्वतःला संपवले आहे. नवनाथ बोंगे असे ह्या तरुणाचे नाव आहे. तो जव्हारमधील एका हॉटेल मध्ये वेटरचे काम करीत होता असे समजते. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकलेले नाही. हा तरुण काल (6 ऑगस्ट) सायंकाळी फेसबुक लाइव्हसाठी सज्ज झाल्यानंतर रडू लागला होता. त्याच्या हालचाली लक्षात आल्यावर अनेक फेसबुक मित्रांनी त्याची समजूत काढण्याचा व विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा संवाद एकतर्फी ठरला. काही सेकंदात नवनाथने पंख्याला बांधलेल्या नायलॉनच्या दोरीवर गळफास घेऊन स्वतःला संपविले. त्याच्या फेसबुक मित्रांची संख्या तब्बल 4 हजार 969 इतकी असून फेसबुक प्रोफाइलमध्ये त्याने आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेतल्याचे नमूद आहे.
