डहाणू : वरिष्ठ अधिकाऱ्याला झाली कोरोना बाधा; पोलिसाने स्वतःच गाठले हॉस्पिटल!

0
1992

दि. 13.04.2020: डहाणू तालुक्यातील बापुगाव येथील एक पोलिस, पालघर जिल्ह्याबाहेर नेमणूकीस होता. तो ज्या पोलिस स्टेशनमध्ये नेमणूकीस होता, तेथील पोलिस अधिकाऱ्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिस गावी परतला व रुग्णालयात जाऊन स्वतःची कोरोना तपासणी करण्याची विनंती केली. कोरोनाबाधीताच्या संपर्कात आल्याने हा पोलिस व त्याच्या पत्नीला, डहाणू येथील उप जिल्हा रुग्णालयात क्वारन्टाईन केले असून, त्यांच्या घशाचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. अहवाल अजून प्राप्त होणे बाकी आहे.

mahanews Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV