डहाणू येथील उप जिल्हा रुग्णालयात 9 एप्रिल रोजी दाखल करण्यात आलेल्या 3 वर्षीय मुलीचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. ह्या मुलीची प्रकृती स्थीर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन वाणेरे यांनी दिली आहे. ही मुलगी वीटभट्टी कामगाराची असून तीला सर्दी, ताप व खोकला झाल्यामुळे 9 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचवेळी तीच्या घशाचे नमुने घेण्यात आले असता, आज तीचा रिपोर्ट प्राप्त झाला आहे. डहाणूमध्ये हे वृत्त पसरताच, एकच खळबळ उडाली असून लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेष म्हणजे याबाबत लोकांमध्ये बातमी पसरली असली तरी जिल्हा आपत्ती निवारण यंत्रणेच्या हेल्प लाईन वर याविषयी काहीही माहिती उपलब्ध नव्हती.
mahanews Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV