डहाणू : 4 जुगार्‍यांना अटक, दोघे फरार

0
2270

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. 21 : डहाणूतील वडकून येथे जुगार खेळणार्‍या 4 जणांना डहाणू पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. तर दोघे जण फरार झाले आहेत. आरीफ गफार मेमन (वय 59), मुस्तुफा बुर्‍हान शेख (वय 45), मुकेशकुमार गोविंद बाथम (वय 26, तिघेही रा. डहाणू) व रविशंकर रामसुरत मिश्रा (वय 39, रा. बोईसर) अशी अटक करण्यात आलेल्या जुगारांची नावे आहेत.

वडकुन कॉलेज रोडवरील श्री जी मेटल (इंडिया) कंपनीच्या शेजारी शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास हे सहाही जण तीन पत्ती नावाचा जुगार खेळत होते. पोलिसांनी अचानक या अड्ड्यावर छापा मारुन चौघांना अटक केली. तर इतर दोघे जण निसटले आहेत. दरम्यान, पोलिसांनी या जुगार्‍यांकडून 3,750 रुपयांची रोख रक्कम जप्त केली असुन त्यांच्याविरोधात महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. डहाणू पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत असुन फरार जुगारींचा शोध सुरु आहे.