डहाणु : रामटेकडी येथून 10 लाखांचा गांजा जप्त

0
2232

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 17 : शहरातील रामटेकडी परिसरातून पालघर स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल 10 लाख 24 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त केला असुन याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. यात एका महिलेचा समावेश आहे.

काल, मंगळवारी पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रामटेकडी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना येथील सरकारी गोडाऊनच्या बाजुला असलेल्या झोपडपट्टीतील एका घराची पथकाने संशयावरुन झडती घेतली. यावेळी त्या घरात 85.285 किलो गांजा आढळून आला. बाजारभावाप्रमाणे या गांजाची किंमत 10 लाख 24 हजार रुपये असल्याचे समजले. दरम्यान, याप्रकरणी रेखा ऊर्फ नगमा अयुब शेख (वय 40) व संतोष दुर्योधन स्वाईन (वय 38) या दोघांना अटक करण्यात आली असुन त्यांच्याविरोधात डहाणू पोलीस स्टेशनमध्ये अंमलीपदार्थ विक्री प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.