केशवसृष्टि संस्थेचे २० हजार फळझाडे लावण्याचे उद्दिष्ट

0
2393
LOGO-4-Onlineराजतंत्र न्युज नेटवर्क 
          वाडा, दि. ०१ : मागील वर्षाप्रमाणे या वर्षी देखील केशवसृष्टि या संस्थेमार्फत वृक्षारोपण करण्यात येणार ८ जुलै रोजी पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड व जव्हार तालुक्यातील ४० गावांमध्ये एकाच दिवसात २० हजार फळझाडे लावण्यात येणार आहेत. यामध्ये केसर आंबा, काजू आणि पेरू याची लागवड केली जाणार आहे.
              या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई व आसपासच्या शहरातील सुमारे ५ हजार नागरिक,  युवक, स्वयंसेवक ग्रामीण भागात येवून वृक्षारोपण कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत. पर्यावरण संवर्धनाबरोबरच ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच शहरातील जनतेला या निमित्ताने ग्रामीण भागाची ओळख होणार आहे, अशी माहिती संस्थेतर्फे देण्यात आली आहे. या उपक्रमातून शेतकर्‍यांना पुढील काही वर्षात या फळझाडांमुळे  मिळणार्‍या फळांपासून चांगले  उत्पन्न प्राप्त होऊ शकेल असा विश्वास केशवसृष्टिचे विश्वस्त बिमलजी केडिया यांनी व्यक्त केला. तर सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केशवसृष्टि संपूर्ण टिम प्रयत्नशील असल्याची माहिती संतोष गायकवाड यांनी दिली.