बोर्डी, दि. 15 फेब्रुवारी : चिखले ग्रामपंचायतीचे सदस्य किरण गणपत पाटील यांचे वडील गणपत दामोदर पाटील (वय 78) यांचे आज, सोमवारी (दि. 15 फेब्रुवारी) वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. गावड भंडारी समाज चिखलेचे ते समाजधुरीन होते. चिखले गावातील हनुमान मंदिर आणि झोटींग मंदीर उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. तर पारंपरिक पद्धतीने धार्मिक सण आणि उत्सवांच्या आयोजनाकरिता त्यांचे नव्यापिढीला मार्गदर्शन लाभले. त्यांच्या पश्चात पत्नी गुलुबाई, किरण, संतोष विवाहित मुले, मुली, स्नुषा, जावई, नातवंडे असा परिवार आहे.