जिल्ह्यात सरासरी 92 % पाऊस

0
3168
Nidhie Infra Builds Square Shape

पालघर, दिनांक 13: जिल्ह्यात आतापर्यंत 147.5 सेमी पावसाची नोंद झाली असून सरासरी 92 टक्के पाऊस पडला आहे. पावसाने जून व जुलै महिन्यात पाठ फिरवली असली तरी ऑगस्ट महिन्यामध्ये कसर बऱ्यापैकी भरुन काढली आहे. जून व जुलै महिन्यामध्ये 86.8 सेमी (66%) पाऊस पडला. ऑगस्ट महिन्यामध्ये मात्र, 12 दिवसांत 60.6 सेमी पाऊस पडला असून तो सरासरीच्या 216% आहे. जिल्ह्यात सरासरी 230 सेमी पाऊस पडतो. आतापर्यंत त्याच्या 64% (147.5 सेमी) पाऊस पडला असून गेल्या वर्षी या तारखेपर्यंत 151% (245 सेमी) पाऊस पडला होता.

पावसाची तालुकानिहाय आकडेवारी:-

  • पालघर तालुका 184 सेमी (112%)
  • डहाणू तालुका 131 सेमी (98%)
  • वसई तालुका 174 सेमी (95%)
  • तलासरी तालुका 123 सेमी (82%)
  • विक्रमगड तालुका 136 सेमी (76%)
  • वाडा तालुका 129 सेमी (71%)
  • जव्हार तालुका 132 सेमी (70%)
  • मोखाडा तालुका 91 सेमी (60%)