वसई तालुक्यातील कॉरन्टाईन केलेले 51 रुग्ण बाहेर हुंदडताना आढळल्याने रुग्णालयात सक्तीने दाखल!

0
2040

दि. 28 मार्च: पालघर जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधात्मक विलगीकरणाच्या व्यक्तींची संख्या आता 55 ने वाढली असून एकूण संख्या 680 झाली आहे.

✒ आमच्या लेखणीला बळ द्या!
▪ 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! आमच्या वाचक क्लबचे सदस्य व्हा! त्यासाठी खालील Link ला Click करा!
▪ https://imjo.in/vq7QpV

विलगीकरणाच्या आकड्यामध्ये वसई तालुक्याने 52 ची भर टाकली असून डहाणू तालुक्याने 3 जणांची भर टाकली आहे. हे आकडे परदेश वारी करुन आलेल्या व देखरेखीखाली ठेवलेल्या नागरिकांचे असून त्यामुळे घाबरुन जाण्याची गरज नाही. मात्र वसई तालुक्यात 5 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणी अहवालातून स्पष्ट* झाले आहे.

वसई महानगर क्षेत्रातील स्वतःच्या घरी क्वारन्टाईन केलेले 48 जण व ग्रामीण वसईतील 3 जण बेजबाबदारपणे बाहेर हिंडताना आढळल्यामुळे अशा 51 जणांना सक्तीने रुग्णालयात क्वारन्टाईन करण्यात आले आहे. या आधीच्या 7 जणांसह रुग्णालयात दाखल क्वारन्टाईन केलेल्यांची संख्या आता 58 झाली असून आणखी 1 जणास पोलिसांच्या निगराणीखाली क्वारन्टाईन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी विरार वसई महानगरातील साडेतीन लाख कुटूंबाना मोफत शिधा घरपोच पोचवण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.