लोकांनी घाबरुन जावू नये! – जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे

0
3402

जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध असून लोकांनी घाबरुन जाऊ नये! – जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांचे यूट्यूब व्हिडीओद्वारे आवाहन.
जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध असून लोकांनी घाबरुन जाऊ नये. सर्व जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांची यादी तयार करण्यात येत असून लोकांना औषधे, भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळण्याची व्यवस्था करण्याची उपाययोजना जिल्हा प्रशासनामार्फत सुरु आहे. लोकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये व दुकानात जावे लागल्यास दोन व्यक्तींमध्ये 3 फूटांचे अंतर बाळगावे असे आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांनी एका यूट्यूब व्हिडीओद्वारे केले आहे. जीवनावश्यक वस्तूंचा साठा अविरतपणे उपलब्ध होणार असल्याने लोकांनी साठा करण्यासाठी गर्दी करु नये असे आवाहनही शिंदे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांचा व्हिडीओ पहाण्यासारखी ही Link उघडा!