
राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू दि. १२ : येथील एचएमपी हायस्कूलचा विद्यार्थी दिशांक केशव नायक याने एसएससी परीक्षेत 96.80 टक्के गुण मिळवून डहाणू तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. दिशांक हा हॉटेल व्यावसायिक केशव नायक (हॉटेल मंजूनाथ) यांचा मुलगा आहे. दिशांकच्या या यशाने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दिशांकने स्वतःबरोबरच शाळेचाही नावलौकिक वाढवला असल्याची प्रतिक्रिया एचएमपी स्कूलचे अध्यक्ष राजेश पारेख यांनी व्यक्त केली आहे.
संबंधित बातमी : अपंगत्वावर मात करत पटकावले 89 टक्के गुण!
