डहाणू दि. 7: अशागड प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. निशांत ठाकर यांच्या प्रयत्नांनी येथील एसीजी कॅप्सुल या कंपनीतर्फे कोरोनाशी लढण्याकरिता लोकांना वाटप करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर व मल्टी व्हिटॅमिनच्या उपलब्ध करण्यात आले आहेत. एसीजी व्यवस्थापनातर्फे आरोग्य केंद्रासाठी 25 पल्स ऑक्सीमिटर, 5 थर्मल स्कॅनर, आरोग्य तपासणीसाठीच्या हॅन्डग्लोव्हज चे 15 बॉक्स, 300 नग N95 मास्क व नागरिकांना वाटप करण्यासाठी मास्क, 60 मिलीलीटर सॅनिटायझर व 10 मल्टी व्हिटॅमिनच्या गोळ्यांचे 3500 आरोग्यसंच देण्यात आले आहेत.

आशागड आरोग्यकेंद्रातर्फे सर्व आरोग्यसंचांचे परिसरातील नागरिकांना वितरित करण्यात आले. या कार्यात तालुका आरोग्य अधिकारी संदीप गाडेकर, जिल्हा परिषद सदस्य जयवंत डोंगरकर, डॉ. निशांत ठाकर, आरोग्य सेवक जे. डी. मोरे व रितेश शेर, फार्मासिस्ट सारिका कदम, सुचिता बारी, वासंती यांनी सहभाग घेतला. या उपक्रमामुळे “माझे कुटूंब, माझी जबाबदारी” कार्यक्रमाबद्दल जनजागृती झाली.