तलासरीत वीज पडून दोघांचा मृत्यू!

मागील 3 दिवसातील तिसरी घटना

0
4699
संग्रहित छायाचित्र

तलासरी, दि. 9 : पालघर जिल्ह्यातील डहाणू व वाडा तालुक्यात वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज, बुधवारी संध्याकाळी तलासरी येथे वीज पडून दोघांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी तलासरी तालुक्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु असतानाच कुर्झे धरण परिसरात 5 वाजेच्या सुमारास अचानक वीज कोसळली. यावेळी तेथे उपस्थित असणार्‍या सचिन कुवरा (वय 27) व अतुल बाबु गोवारी (वय 18, दोघे राहणार बेंडगाव, ता. डहाणू) यांचा मृत्यू झाल्याचे पालघर जिल्हा माहिती कार्यालयातर्फे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, 6 सप्टेंबर रोजी डहाणू तालुक्यातील तवा येथे वीज कोसळून नितेश हाळ्या तुंबडा या 20 वर्षी तरुणाचा तर वाडा तालुक्यात शांताराम दिवा या तरुणाचा मृत्यू झाला आहे.