- तुम्ही Youtube वर News Channel किंवा News Portal चालवता का? मग तुमच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी आहे!
- केळवे समुद्रात चार मुलांचा बुडून मृत्यू!
- मुजोर विराज उद्योजका विरोधात कामगार आक्रमक
- घिवलीच्या पुनर्वसनाची मागणी
- महिलेला दोन लाखाचे सोन्याचे दागिने रेल्वे पोलिसांनी केले परत

बोईसर, दि. 8 सप्टेंबर: तारापूर औद्योगिक वसाहतीतील प्लॉट क्र. एच 1 मधील लविनो कपूर कॉटन्स ह्या कारखान्यातील एका कंत्राटी कामगाराचा हात मशिनमध्ये गेल्याने क्षतीग्रस्त झालेला असताना, कंपनीने जबाबदारी झटकली आहे. 9 महिन्यापूर्वी घडलेल्या अपघातामुळे कामगाराच्या हाताच्या हालचाली होत नसून त्यासाठी आवश्यक ती शस्त्रक्रिया करण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाकडून मदत दिली जात नाहीये. कामगाराला 1 दमडीची मदतही मिळालेली नाही. त्याचा रोजगारही बंद झाल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
परवेश दर्शन असे ह्या दुर्दैवी पिडीत कामगाराचे नाव आहे. तो बोईसरच्या भीमनगर मध्ये विधवा आई व बहिणीसह रहातो. त्याच्या कमाईवर कुटूंबाचा उदरनिर्वाह चालतो. 8 डिसेंबर 2019 रोजी तो कामावर गेला असता कापूस हाताळणाऱ्या मशिनमध्ये त्याचा हात गेला व हाताला गंभीर इजा झाली. त्यानंतर त्याला बोईसरच्या आनंद हॉस्पिटल या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे आठवडाभर उपचार झाल्यानंतर परवेशला घरी सोडण्यात आले. उपचाराची कुठलीही कागदपत्रे त्याच्या हाती देण्यात आलेली नाहीत. त्याच्या हाताच्या पंजाची हालचाल होत नसून त्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. मात्र कारखान्यातर्फे पुढील उपचारासाठी टाळाटाळ केली जात आहे. सध्या तो काम करु शकत नसल्याने त्याच्या चरितार्थाचा प्रश्न निर्माण झाला असून कारखान्यातर्फे त्याला पगार दिला जात नाही किंवा कुठलीही नुकसानभरपाई दिली गेली नाही. नेहमीप्रमाणेच पोलिस प्रशासन, कामगार अधिकारी, कारखाना निरीक्षक यांच्या कानापर्यंत परवेशचा आवाज पोहोचलेला नाही. परवेश न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.
