मागील 24 तासांत पालघर जिल्ह्यात 117 नवे +Ve! मोखाड्याने देखील खाते खोलले!

0
2250

दि. 13 जून : मागील 24 तासांत पालघर जिल्ह्यात 117 नव्या कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. सर्वाधिक 96 बाधीत एकट्या वसई विरार महानगर क्षेत्रातील आहेत. उर्वरीत 21 जण पालघरच्या ग्रामीण भागातील आहेत. त्यामध्ये पालघर तालुक्याच्या 10, जव्हार तालुक्याच्या 6, तलासरी व वाडा तालुक्यातील प्रत्येकी 2 व मोखाड्यातील 1 बाधीताचा समावेश आहे. तलासरीतील 2 व मोखाड्यातील 1 कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तीमुळे पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांपर्यंत कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

mahanews Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता. https://imjo.in/vq7QpV(आपण आयडियल ट्रेडर्स, डहाणू नगरपरिषद कार्यालयाखाली, डहाणूरोड यांचेमार्फतही 300 रुपये वर्गणी भरु शकता!)

आज रोजीची कोरोना बाधितांची आकडेवारी:
वसई विरार महानगर क्षेत्र – 1384 (46 मृत्यू)
वसई ग्रामीण तालुका – 70 (3 मृत्यू)
पालघर तालुका – 108 (3 मृत्यू)
वाडा तालुका – 60
विक्रमगड तालुका – 47
डहाणू तालुका – 44
जव्हार तालुका – 10
तलासरी तालुका – 2
मोखाडा तालुका – 1