डहाणू तालुक्यात वीज कडाडून 1 ठार, 1 जखमी

0
9727

6 सप्टेंबर: आज दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास डहाणू तालुक्यातील तवा येथे वीज कडाडून नितेश हाळ्या तुंबडा व अनिल सुधाकर धिंडा हे नमपाडा येथील युवक गंभीररित्या जखमी झाले. दोघांना वेदांत हॉस्पिटल (धुंदलवाडी) येथे नेले असता त्यातील नितेशचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले. अनिल शुद्धीत असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.