गडचिंचले साधू हत्याकांड: सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव काळेसह 3 जणांची पोलीस दलातून हकालपट्टी

0
2409

31 ऑगस्ट: डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे 16 एप्रिल 2020 रोजी झालेल्या साधू हत्याकांड प्रकरणी कासा पोलीस स्टेशनचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव काळे यांच्यासह सहाय्यक फौजदार रवी साळुंके व पोलीस कॉन्स्टेबल नरेश धोडी यांची पोलीस दलातून हकालपट्टी करण्यात आली आहे. याआधीच त्यांना निलंबित करण्यात आले होते. काल (30 ऑगस्ट) कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांनी ह्या तिघांच्या बडतर्फीचे आदेश काढले आहेत. आनंदराव काळे यांनी घटनास्थळावर पोहोचल्यानंतर साधूंना वाचवण्याचे कुठलेही प्रयत्न केलेले नाहीत. ते पोलीस वाहनामध्ये बसून राहिले. तर रवी साळूंके यांनी स्वतःचा हात सोडवून घेत साधूला जमावाच्या अधीन केले होते. पोलीसांसमोर घडलेल्या साधूंच्या हत्याकांडामुळे देशभर महाराष्ट्र पोलीसांची नाचक्की झाली होती. ह्याच प्रकरणात तत्कालीन पोलीस अधिक्षक सक्तीच्या रजेवर आहेत.