
राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 4 : पालघर जिल्हा परिषदेच्या विविध विषय समिती सभापती पदाची निवडणूक आज, बुधवारी पालघर पंचायत समिती सभागृहात पीठासीन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ. किरण महाजन यांच्या अध्यक्षते खाली शांततेत पार पडली.

यावेळी अनुष्का अरुण ठाकरे यांची महिला बाल कल्याण समिती सभापती पदावर, विष्णु लक्ष्मण कडव यांची समाज कल्याण समिती सभापती पदावर तसेच काशिनाथ गोंविंद चौधरी आणि सुशिल किशोर चुरी यांची उर्वरित दोन सभापती पदांवर निवड करण्यात आली आहे. दरम्यान, निवडून आलेल्या सर्व विषय समिती सभापतींचे जिल्हा परिषद अधक्षा भारती कामडी, उपाध्यक्ष निलेश सांबरे, तसेच सर्व जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी, अधिकारी व उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले. या निवडीकरीता जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघरत्ना खिल्लारे तसेच जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.