
दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 1 : येथील सुर्यमाळ शासकीय आश्रमशाळेच्या रमेश नंदन या मुख्याध्यापकाने दारूच्या नशेत आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना सतत दोन दिवस मारहाण केल्याचा आरोप असुन या प्रकरणाची दखल घेत आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णु सवरा यांनी जव्हार प्रकल्प अधिकारी कार्यालयाला याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर सहाय्यक प्रकल्प अधिकारी आर. ए. गुजर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन व विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्रकल्प अधिकारी अजित कुंभार यांना प्राथमिक अहवाल सादर केला आहे.
मोखाड्यातील सुर्यमाळ शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक रमेश नंदन यांनी 26 व 27 फेब्रूवारी रोजी येथील आदिवासी विद्यार्थ्यांना दारूच्या नशेत तर्र होऊन खोलीत बंद करून मारहाण तसेच शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या घटनेविषयी येथील पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीने थेट आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तर प्रकल्प अधिकारी कुंभार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी तक्रार केली होती.
या तक्रारीची तातडीने दखल घेत, तसेच आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा यांच्या आदेशान्वये सहाय्यक प्रकल्प अधिकारी गुजर यांनी आश्रमशाळेला भेट देऊन पिडीत विद्यार्थ्यांशी संवाद साधला व सत्यता पडताळली. तसेच याबाबतचा अहवाल प्रकल्प अधिकारी कुंभार यांना दिला असल्याची माहिती गुजर यांनी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नशेत व नाहक मारहाण करणार्या रमेश नंदन या मुख्याध्यापकावर काय कारवाई केली जाईल? याकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
- आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा