
जव्हार, दि. 9 : आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रात इव्हीएममशीन सोबत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी मतदारांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनबाबत जनजागृती निर्माण होण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत प्रत्येक विधानसभा क्षेत्रात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमा अंतर्गत आज जव्हार महाविद्यालयात इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
यावेळी मतदार नोंदणी अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी युवा मतदारांना मार्गदर्शन करतानाच जास्तीत जास्त मतदारांनी या जनजागृती कार्यक्रमात सहभागी होण्याचे तसेच तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी संतोष शिंदे यांनी युवा मतदारांना मतदान प्रक्रियेबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. आर. मेश्राम यांनी देखील यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जुन्या व नविन निवडणूक पद्धतीतील फरक व नविन पद्धतीच्या निवडणूकीचे फायदे सांगितले. यावेळी जव्हारचे नायब तहसीलदार वसंत सांगळे, उपप्राचार्य डॉ. पी. एम. भागडे, प्राध्यापक डॉ. हेमंत मुकणे, प्राध्यापक तथा मतदार साक्षरता क्लबचे नोडल आधिकारी पी. एस. राठोड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या प्रात्यक्षिक कार्यक्रमामध्ये एकूण 714 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
[divider]
आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!